*तुमको न भूल पाएँगे — भाग ३*
*सप्रे*म नमस्कार मंडळी !
काल तुम्हाला मी म्हटलं तसं , रफीसाहेबांवर लिहायचं तर कितीहि लिहिलं तरी थोडंच अाहे ! अाता हेच बघा ना , काल अापण १९४५—१९४८ अशा साधारणत: ४ वर्षांच्या कारकिर्दिविषयी अाढावा घेतला व अाज अापण पुढे सरकणार होतो.पण मंडळी , माझ्यातल्या लेखकाची *क्वचित् वा अनभिज्ञ अशी माहिती रसिक वाचकांपर्यंत पोचवण्याची* खुमखुमी मला स्वस्थ बसू देईल तर ना ! कालचा लेख टाकून झाल्यावरहि अशी *खूपशी माहिती सांगायची राहून गेली — कालच्या त्या १९४८ पर्यंतच्या कालखंडात* असं मला वाटू लागलं अाणि अामची गाडी परत रिव्हर्स गिअर टाकून १९४५ सालात परंत अाली.तर मंडळी , राहिलेली माहिती अाधी सांगून मोकळा होतो या प्रवासाची गाडी चालवंत ! चला तर मग , ऐका.....
मोहम्मद रफीबरोबर हिंदी सिनेसंगीत गाणारी पहिली पार्श्वगायिका होती अभिनेत्री व गायिका अमीरबाई कर्नाटकी.१९४५ च्या *कुलकलंक* या सिनेमात ए.अार.कुरेशी अर्थात् तबलानवाज अल्ला रखाँ साहेबांच्या { म्हणजेच उस्ताद झााकीर हुसैन व तौफिक कुरेशी यांचे वडिल — यांच्या } संगीतात रफीने *टोपीवाले बाबू ने दिल छिना रे मोरा मन छिना* हे गाणं अमीरबाईबरोबर गायलं होतं.हे गाणं अमीरबाई व अभिनेता मसूद यांच्यावर चित्रित करण्यात अालं होतं.पण हा सिनेमा १९४६ साली नांव बदलून *जीवनछाया* या नावाने प्रदर्शित झाला!
१९४५ साली रफीने *मोहनतारा तळपदे ( माहेरची ) अजिंक्य* या गायिकेबरोबर *बेगम* या चित्रपटात *एच.पी.दास* यांच्या संगीतात *दिल दिए चले , दिल दिए चले , हम जिये चले ऐसे* हे गाणं गायलं होतं.
१९४६ साली प्रकाश पिक्चर्सच्या *घूँघट* या चित्रपटात *निर्मलादेवी व अरूण अाहुजा* यांच्या नायक—नायिकेच्या भूमिका होत्या.व रफीने या निर्मलादेवींबरोबर *शंकरराव व्यास* यांच्या संगीतात *नैनोंसे मद मदिरा पिलाकर तुमने हमें दिवाना किया* हे गीत गायलं. हे निर्मलादेवी—अरूण अाहुजा म्हणजे अाजकालच्या { *कुछभी* } — *नंबर वन्* चित्रपटाचा हिरो *गोविंदा*चे अाई—वडील!
अभिनेत्री व गायिका असणार्या नूरजहाँबरोबर १९४७ मधे *जुगनू* या चित्रपटात *फिरोझ निझामी* यांच्या संगीतात रफीने नूरजहाँबरोबर *यहाँ बदला वफाका बेवफाईके सिवा क्या है* हे गाणं गायलं होतं. *गाँवकी गोरी* नंतर हे रफीचं नूरजहकँबरोबरचं दुसरं व शेवटचं गाणं! १९४७ च्या फाळणीनंतर नूरजहाँ पाकिस्तानला निघून गेली.सैगल त्या काळातला नामवंत गायक असूनहि सैगल नूरजहाँबरोबर कधीही गाऊ शकला नाहि!
अभिनेत्री असलेली अाणखीन एक गायिका म्हणजे *खुरशिद* — *तानसेन* व *भक्त सूरदास* चित्रपटातील सैगलची नायिका! १९४७ च्या *अागे बढो* या चित्रपटात *बाबूजी ऊर्फ सुधीर फडके* यांच्या संगीतात रफीने खुरशिदबरोबर *सावनकी घटा , धीरे धीरे अाना* हे *एकमेव* गाणं गायलं.फाळणीनंतर खुरशिद पण पाकिस्तानला निघून गेली !मंडळी , हि खुरशिद म्हणजे अापली सगळ्यांची अावडती मधाळ अावाजाची ट्रॅजिडी क्वीन मीनाकुमारीची मोठी बहिण.
मंडळी , अापल्या उमेदवारीच्या काळात महम्मद रफी पहाटेचा रियाझ मुंबईच्या मरीन ड्राईव्हला करायचा ! एका रात्रीत रफीला यश मिळालेलं नाहि राव! { अाणि तसं ते कुणालांच मिळत नसतं ! } ते यश मिळवण्यासाठी रफीने अपार कष्ट घेतलेत ! बांद्र्याला रहाणारा रफी दररोज पहाटे ४.३० वाजता उठून मरीन ड्राईव्हला यायचा. पहाटेचा व्यत्ययहीन शांत रियाझ करता यावा म्हणून ! त्याकाळात उमेदवारी करणार्या रफीला हि कल्पनाच नव्हती की अापले रियाझी स्वर एक प्रसिद्ध नटी/अभिनेत्री व गायिका मरीन ड्राईव्हवरच्या अापल्या राहत्या घरात बसून रोज ऐकत असते ! एके दिवशी मात्र त्या गायिकेला स्वस्थ बसवेना , चौकशीअंती तिला कळलं की हा स्वर्गीय अावाजाचा बोलविता धनी दुसरा तिसरा कुणीच नसून दस्तुरखुद्द मोहम्मद रफीच अाहे ! रफीला याबाबत अधिक छेडलं असता रफीने सांगितलं की तो रहात असलेली जागा खूपंच रहदारीची असल्याने त्याच्या पहाटेच्या रियाझामुळे लोकांची झोपमोड होऊ नये म्हणून तो रोज पहाटे मरीन ड्राईव्हला येत असे की जेणेकरून नीरव शांततेत त्याला व्यत्ययाविना रियाझ करता यावा!
त्या दिवसापासून मात्र पुढे वर्षभर , रफीनं दुसरं मोठ्ठं घर घेईपर्यंत , रफीचा रियाझ मरीन ड्राईव्हवरील या गायिकेच्या राहत्या घरी बिनबोभाट पार पडला !
अापल्या अावाजाची मोहिनी गोड गळ्या—चेहेर्याच्या त्या सुप्रसिद्ध नटीवर पाडू शकणारा रफी महान् अाणि भविष्यातील संगीतातील ध्रुवतार्याला अापली जागा पहाटेच्या रियझासाठी वापरू देण्याचं औदार्य दाखवणारी ती नटी पण तितकीच महान !
मंडळी ती सुप्रसिद्ध नटी/अभिनेत्री अाणि गायिका म्हणजे *सुरैय्या* !
नूरजहाँ व खुरशिदबरोबर एकाच चित्रपटात गाणारा रफी सुरैय्या बरोबर मात्र *बालम , काजल , दुनिया , नाच , दास्तान , खिलाडी , शान , सनम , गूँज , शमा—परवाना , मिस्टर लंबू , ट्राॅली ड्रायव्हर , रंगमहल* या १३ सिनेमांत गायला.ती गाणी : *चित्रपट — साल — संगीतकार — गाण्याचे बोल* या अनुक्रमाने अशी होती.....
*काजल* — १९४८ — गुलाम महंमद — तारोंभरी रात है पर तू नहिं
*रंगमहल* — १९४८ — के.दत्ता — रूठो न तुम बहारमें
*बालम* — १९४९ — हुस्नलाल — भगतराम — अाता है जिंदगीमें भला प्यार किस तरह , अाँखें उठाओ फिर मैं बताऊँ
*दुनिया* — १९४९ — सी.रामचंद्र — हाय ये तूने क्या किया , किस्मतके लिखे को मिटा न सके
*नाच* — १९४९ — हुस्नलाल — भगतराम — सीनेमें अाग भडकती है , छाया समाँ सुहाना
*दास्तान* — १९५० — नौशाद — तारारी रारारी रारारी ये सावन रुत तुम और हम , दिलको हाय दिलको तेरी तस्वीर बहलाए हुवे हैं , बुप्पी बुप्पी बुप्पी तके धुम तके धुम...धडक धडक दिल धडके
*शान* — १९५० — हंसराज बहल — दिलके धोकेमें न अाना , हमभी अकेले तुमभी अकेले , हम तुमसे वफा करते तुम हमसे वफा करते
*खिलाडी* — १९५० — हंसराज बहल — मुहब्बतमें नजर मिलते हि , यह प्यारकी मंझिलसे मुझे किसने सदा दी
*सनम* — १९५१ — हुस्नलाल — भगतराम — ओ सनम ओ सनम मैं तुझे पुकारूँ , मैं कह दूँ तुमको चोर तो बोलो
*गूँज* — १९५२ — शार्दूल क्वात्रा — गूँज नहिं है यह पर्वतकी , ओ मेरी प्यारी मोना
*शमा—परवाना* — १९५४ — हुस्नलाल—भगतराम — सर ए महफिल जो जला परवाना , बेकरार है कोई , शाम—ए—बहार अाई करके सिंगार अाई
*मिस्टर लंबू* — १९५६ — ओ.पी.नय्यर — तू जरासी बातपे खफा न हो , तू मेरा दिलरुबा मैं तेरी दिलरुबा
*ट्राॅली ड्रायव्हर* — १९५८ — हुस्नलाल — भगतराम — यह रात यह नजारे , अा जाओ अा भी जाओ
मंडळी , अाता मी तुम्हाला एका अशा गाण्याबद्धल माहिती सांगणार अाहे , ज्या गाण्याने सैगल व करण दीवान या गायकांच्या सुप्रसिद्ध विरहगीतांचा वारसा पुढे चालवला.....ते गाणं होतं रफीने गायलेलं *इस दिलके टुकडे हजार हुए कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा* ......
या गाण्याचं नशिबंच वेगळं होतं व त्याचे दोन किस्से अाज मी तुम्हाला सांगणार अाहे.ऐका तर मग......
१९४७ साली फिल्मिस्तानचे सर्वेसर्वा शशधर मुखर्जी यांनी *सिंदूर* नामक एक चित्रपट काढला. कमर जलालाबादींनी *इक दिलके टुकडे हजार हुवे* हे गीत लिहिलेलं.पण या गीताचा मुखडा वाचताच शशधर मुखर्जींनी तो कागद फेकून दिला व कमरना सुनावलं , "ही असली भिकार गाणी चित्रपटासाठी लिहित जाऊ नका! प्रेक्षक असली गाणी चित्रपटात कधीच चालवून घेणार नाहित!"
गीताचा कागद उचलून कमर बाहेर पडले.
पुढे १९४८ मधे *प्यारकी जीत* नावाचा चित्रपट ओ.पी.दत्ता दिग्दर्शित करंत होते { १९९७ च्या *बाॅर्डर* चे दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांचे वडील }.एका विरह गाण्याची situation निर्माण झाली व कमरनी हाच कागद ओ.पी.दत्तांपुढे सरकवला.कागदावरील गाण्याचा मुखडा वाचताक्षणीच ओ.पी.दत्तांना ते इतकं अावडलं की त्यांनी हुस्नलाल—भगतराम या संगीतकार जोडीला गाणं संगीतबद्ध करायला सांगून गाणं चित्रपटात सामाविष्ट केलं !
मंडळी अाता याच गाण्याचा दुसरा किस्सा.....
१९४७ सालचा *जुगनू* रिलीज होईपर्यंत ज्वार भाटा , प्रतिमा , मिलन या तीन चित्रपटात काम करूनहि दिलीपकुमार नायक म्हणून प्रेक्षकांना तितकासा भावला नव्हता.पण *जुगनू* रिलीज झाला अाणि रफीच्या *यहाँ बदला वफाका* या गाण्याने त्याला नायक म्हणून मान्यता मिळवून दिली.पण हि मान्यता खरं तर *रहमानला* मिळायची होती.अभिनेत्री व गायिका नूरजहाँचे पती शौकत हुसेन जुगनूचे निर्माते—दिग्दर्शक होते.त्यांना नूरजहाँबरोबर जुगनूत नायक म्हणून रहमान हवा होता.पण फेमस पिक्चर्सच्या करारात बांधला गेलेला रहमान त्यांच्या संमतीशिवाय अन्य कुठल्या चित्रसंस्थेच्या चित्रपटात काम करू शकत नव्हता!अाणि फेमस पिक्चर्सचे सर्वेसर्वा बाबुराव पै हे रहमानला घेऊन *नर्गिस* चित्रपटाच्या निर्मितीच्या तयारीत होते व त्यांना *नर्गिस*साठी रहमानबरोबर नायिका म्हणून नूरजहाँ हवी होती.त्यामुळे *जुगनू*साठी शौकत हुसेननी रहमानला नायकाची अाॅफर देताच बाबूराव पैंनी *जुगनू साठी रहमान* च्या बदल्यात *नर्गिस साठी नूरजहाँ* अशी Counter Offer दिली.पण शौकत हुसेन ला हि Counter Offer नामंजूर असल्याने *नर्गिस* मधे रहमानसोबत बाबूराव पैंनी नर्गिसला नायिका म्हणून उभी केली अाणि इकडे शौकत हुसेननी *जुगनू* मधे नूरजहाँसोबत नायक म्हणून दिलीपकुमारला उभं केलं अाणि पुढे मग रफीच्या *यहाँ बदला वफाका* या वीराणीवर दिलीपकुमारवर देवदास छाप नायकाचं शिक्कामोर्तब झालं.
पुढे १९४८ मधे *प्यारकी जीत* साठी रहमान नायक म्हणून निवडला गेला अाणि रफीच्या *इक दिलके टुकडे हजार हुवे* या विरहगीतावर नायक म्हणून मान्यता पावला !
मंडळी , अशा प्रकारे रफी पण *इक दिलके टुकडे हजार हुवे* या विरहगीताच्या लोकप्रीयतेमुळे सैगलच्या नंतर विरहगीत गायक म्हणून मान्यता पावला !
अशा प्रकारे १९४८ साल हे रफीसाठी पायाभरणीचं साल ठरलं , कारण त्यानंतर रफीने चित्रपटात सगळ्यात जास्त विरहगीतं गायली!
तर मंडळी , विरहगीतांच्या भक्कम पायावर उभी राहिलेली *मोहम्मद रफी* ची कारकीर्द पुढे कशी बुलंद घडंत गेली ते उद्याच्या भागापासून पाहूया.
कळावे ,
अापला विनम्र ,
*उदय गंगाधर सप्रे*म—ठाणे

No comments:
Post a Comment